पुणे जिल्ह्यातील 27 गावे सील

0

पुणे: शहरात करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील 26 गावे सील करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शहर देखील सील आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यावश्‍यक सेवा वगळता जिल्ह्यातील इतर सर्व नागरिकांना पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. जिल्ह्यात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. बाधित रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने जिल्ह्यातही प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे.

ही गावे सील

पुणे महानगरपालिका – संपूर्ण पुणे शहराची हद्द, पिंपरी-चिंचवड महापालिका- संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराची हद्द, बारामती नगरपरिषद – संपूर्ण बारामती नगरपरिषद हद्द, हवेली तालुका – जांभूळवाडी, वाघोली, आव्हाळवाडी, बावडी, केसनंद, नांदेड, खडकवासला, किरकटवाडी, सोनापूर, मालखेड, वरदाडे, जांभूळवाडी, कोळेवाडी, कोल्हेवाडी, नऱ्हे, खानापूर, लोणीकंद, उरुळीकांचन, पिसोळी, वडाचीवाडी, हांडेवाडी. शिरूर – विठ्ठलवाडी, शिक्रापूर. वेल्हा – निगडे, मोसे. भोर – नेरे. जुन्नर – डिंगोरे आदी गावे सील करण्यात आली आहे.

Copy