पुणेकरांनी बोलवलेच कधी होते? अजित पवारांचा चंद्रकांत पाटीलांना टोला

0

पुणे: पुण्यात प्रत्येकाला सेटल व्हायचे असते, पण मी पुण्यात सेटल होणार नाही. पुन्हा परत कोल्हापूरला जाईल असे काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. यावरून आज राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला आणि चंद्रकांत पाटील यांना टोला हाणला आहे.

पुणे अर्थात कोथरूडकरांनी चंद्रकांत पाटील यांना पाच वर्षांसाठी निवडून दिले आहे. मात्र एका वर्षातच चंद्रकांत पाटील परत कोल्हापूरला जायचे म्हणत आहेत. पुन्हा जाईन म्हणणाऱ्यांना पुणेकरांनी बोलविलेच कधी होते? असा टोला अजित पवारांनी लगावला आहे.

‘काही लोक मी पुन्हा येईल, पुन्हा येईल’ असे सांगत होते. मात्र त्यांना पुन्हा येता आले नाही. मात्र जे आहेत तेच परत जायचे म्हणताय असा टोलाही अजित पवारांनी लगावला आहे. शेतकऱ्यांसाठी भाजपने काल पुण्यात आंदोलन केले. मात्र दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन त्यांना खोटे वाटते. भाजपचे शेतकऱ्यांबाबतचे दुटप्पी धोरण यातून स्पष्ट होते असा आरोपही अजित पवारांनी केला आहे.

Copy