पी.एम.फंडाला निधी देत शेलवडात झाला आदर्श विवाह

0

बोदवड : तालुक्यातील शेलवड येथे कोरोनाच्या जागतीक महामारीत पारंपरीकक रूढी-परंपराना फाटा देत लग्नावरील अनावश्यक खर्च टाळून शेलवड येथील जंजाळ परीवाराने पीएम फंडात मदत केली. साध्या पध्दतीने विवाह सोहळा आटोपत तसेच विवाहप्रसंगी सोशल डिन्स्टसींगचे पालन करण्यात आले तसेच लग्नातील वर्‍हाडी मंडळीना नवदाम्पत्याच्या वतीने मास्क, सॅनिटायझर आर्सेनिक अल्बम 30 या रोगप्रतिकार क्षमता वाढविण्यासाठीच्या आयुर्वेदिक गोळ्या देण्यात आल्या. कोविड 19 ची आपत्ती लक्षात घेता सामाजिक भान राखत शेलवड येथील जंजाळ-पाटील व सुरवाडे येथील बाविस्कर-पाटील परीवाराने आदर्श विवाह सोहळा पार पडला. या आदर्श विवाह सोहळयाप्रसंगी बोदवड तहसीलदार हेमंत पाटील, अनंत कुलकर्णी, हरीओम जैस्वाल, अनिल खंडेलवाल, पोलिस पाटील प्रदीप सुकाळे, विनोद चौधरी प्रमुख उपस्थित होते.

मदत कार्य कौतुकास्पद -तहसीलदार
आजच्या सामाजिक परीस्थितीत तसेच कोरोनाच्या काळात लग्नावरील अनावश्यक खर्च टाळून पीएम फंडासाठी मदत व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती करत केलेले विवाहात केलेले मदत कार्य कौतुकास्पद आहे असल्याची भावना तहसीलदार हेमंत पाटील यांनी व्यक्त केली.

पी.एम.फंडासाठी केली मदत
लॉकडाऊन काळात लग्नातील अनावश्यक खर्च टाळून पीएम फंडासाठी 11 हजार 111 रुपयांची मदत व कोरोनाच्या आपत्तीपासून रक्षणासाठी मास्क, सॅनिटायझर व आर्सेनिक अल्बम 30 गोळ्या विवाह प्रसंगी वाटप करण्यात आल्याचे वर राहुल जंजाळ यांनी सांगितले.

Copy