Private Advt

पीडित काश्मिरी हिंदूंच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत लढतच राहू ! – सुशील पंडित

,

  जळगाव – वर्ष 1990 मध्ये काश्मीरमध्ये हिंदूंच्या सामूहिकपणे हत्या झाल्यात्याला ‘नरसंहार’ म्हणून सरकारने स्वीकारावेया नरसंहाराला जबाबदार सर्व दोषींना कठोर शिक्षा द्यावीया नरसंहारात पीडित हिंदूंच्या जमिनीसंपत्ती तेथील धर्मांध मुसलमानांनी बळकावल्यात्या हिंदूंना परत देण्यात याव्यात आणि विस्थापित हिंदूंना काश्मीरमध्ये पुन्हा राहण्यासाठी विशिष्ट जागा देण्यात यावीअशा मागण्या आमच्या केंद्र सरकारकडे आहेतदुर्दैवाने सध्याचे केंद्र सरकारही या नरसंहाराला जे उत्तरदायी होतेत्यांचे मन जिंकण्यात मग्न आहेमात्र आम्ही काश्मिरी हिंदू झुकणार नाही आणि आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत लढतच राहूअसे स्पष्ट प्रतिपादन ‘रूट्स इन काश्मीर’चे संस्थापक श्रीसुशील पंडित यांनी केलेते ‘हिंदु जनजागृती समिती’ आयोजित ‘19 जानेवारी काश्मिरी हिंदू विस्थापन दिवस – काश्मिरी हिंदूंना न्याय कधी मिळणार ?’ या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात बोलत होतेहिंदु जनजागृती समितीचे देहली प्रवक्ते श्रीनरेंद्र सुर्वे यांनी श्रीसुशील पंडित यांच्याशी संवाद साधला. 19 जानेवारी 1990 या दिवशी धर्मांधांनी मशिदींमधून ‘हिंदूंनोकाश्मीरमधून चालते व्हा’ अशा घोषणा देत लाखो हिंदूंना काश्मीरमधून हाकलून लावलेएका रात्रीत काश्मीरमधील हजारो हिंदूंच्या हत्या झाल्या आणि लाखो हिंदू विस्थापित होऊन त्यांचे सर्वस्व हरवून बसलेया क्रूर घटनेला 31 वर्षे पूर्ण झालीतरी काश्मिरी हिंदूंना न्याय मिळालेला नाहीया निमित्ताने हा ‘ऑनलाईन’ विशेष संवाद आयोजित करण्यात आला होता.

       श्रीसुशील पंडित पुढे म्हणाले, ‘काश्मिरी हिंदूंची हत्या करणारे अजून जिवंत आहेतत्यांच्यावर कोणत्याही न्यायालयात खटला चालू नाहीकाश्मिरी हिंदूंचे जे दोषी आहेतत्यांच्यावर अभियोगखटले दाखल करुनत्यांची संपत्ती जप्त करुन त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे होतीमात्र असे काहीही न होता त्यांचे लांगूलचालन करुन त्यांना सर्व सुविधा आतापर्यंतच्या सर्व केंद्र सरकारांनी उपलब्ध करुन दिल्याकाश्मिरी हिंदूंवर झालेल्या अत्याचाराविषयी बोलायचे नाहीत्यांना न्याय द्यायचा नाहीअशी व्यवस्था आपण निवडून दिली आहेपंथनिरपेक्षतेच्या नावाखाली आपण पाखंडी व्यवस्था स्वीकारली आहेयात अनेक राजकीय नेतेन्यायव्यवस्थाप्रसारमाध्यमेबुद्धिवादीनागरिक मंचनोकरशाही सहभागी आहेतवर्ष 2017 मध्ये काश्मिरी पंडितांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होतीमात्र ‘आता या याचिकेला खूप उशीर झाला आहेआता यातील साक्षीदार आणि पुरावे कोण शोधणार ?’ अशी अनेक कारणे देत सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळलीअसे असले तरी याच वर्षी गांधी हत्येचा न्यायालयीन खटला पुन्हा सुरु केला गेलातसेच दोषी आतंकवाद्यांसाठी मध्यरात्री सुद्धा या देशात न्यायालयीन खटले चालवले जातातहे खेदजनक आहेदेशाची न्यायसंस्था आणि राजकीय व्यवस्था यांनी देशाची पंथनिरपेक्षता धोक्यात येण्याचा भीतीने काश्मिरी हिंदूंना न्याय मिळविण्यापासून वंचित केले आहे.’