पीक कर्ज वाटप ठप्प: भाजपचे निदर्शने

0

नंदुरबार-पावसाळा सुरू झाला असूनही खरीप हंगामाचे पीक कर्ज वाटप ठप्प आहे. शिवसेना,काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे महाआघाडी सरकारने पुढाकार घेऊन ताबडतोब पिक कर्ज वाटप सुरू करावे.  कर्जमाफीची अंमलबजावणी करावी.तसेच शेतक-यांच्या बांधावर बि बियाणे,खते व आैषधांचा पुरवठा करावा,यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजयभाऊ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली शहरातील स्टेट बँकेच्याबाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली.

राज्यात भाजपाचे ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली.याच प्रमाणे भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजयभाऊ चौधरी यांच्यासह पदाधिका-यांनी तहसिलदारांची भेट घेऊन निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे ,देशाचा मालक असलेला शेतकरी महाआघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे संकटात सापडला आहे. पावसाने हजेरी लावली आहे.शेत जमीनीत ओलावा आहे. अशा प्रसंगी शेतक-यांना बि बियाणे ,खत व औषधी खरेदीसाठी पीक कर्जाची तातडीची आवश्यकता असतांना शेतक-यांना बि बियाणे औषधी खरेदीसाठी सारख्या चकरा माराव्या लागत आहे. कोरोना महामारीच्या अनुषंगाने तत्पादीत ममालाला अपेक्षित भाव मिळाला नाही. शेतक-यांने शेतीसाठी केलेला खर्च देखील निघालेला नाही. आधीच कोरोनामुळे अडचणीत सापडलेला शेतकरी सरकारच्या महाआघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे त्रस्त झाला आहे. या शेतक-यांला व्यापक स्वरूपात मदत होण्याच्या दृष्टीकोनातून संकटातून बाहेर काढण्यासाठी आवश्यकत लक्षात घेता पीक कर्ज उपलब्ध करून मागील संपुर्ण कर्ज मापु करावे,तसेच शेतक-यांच्या बांधावर तात्काळ खते, बि बियाणे औषधी पुरवठा करावा,असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निवेदनावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, देवमोगरा एज्यूकेशन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार गावित, महेंद्र पटेल,शहराध्यक्ष नरेंद्र माळी, युवामोर्चाचे सचिव हर्षल पाटील,युवा किसान मोर्चाचे बुधाभाई पाटील,संजय पटेल, दशरथभाई पटेल, विलासभाई पटेल आदींच्या सहया आहेत.

Copy