पीएसआयपदी निवड झालेल्या पंकज सपकाळेंचा सत्कार

0

धरणगाव । प्रतिकूल परिस्थितीत, जिद्द, चिकाटी आणि परीश्रमाच्या बळावर पंकजने पीएसआय परीक्षेत मोठे यश मिळवले आहे. तो विद्यार्थ्यांसाठी एक नवा आयकॉन झाला आहे. या यशाने हुरळून नजाता भविष्यात त्याने अधिक मोठे यश मिळवावे. गांवाशी नाळजुळवून ठेवावी. गांवाच्या विकासात योगदान द्यावे. गांवाचा लौकिक वाढवावा अशी अपेक्षा डी.जी.पाटील यांनी व्यक्त केली. यथील गौतम नगरमधील होतकरु तरुण पोलीस कॉन्स्टेबल पंकज सपकाळे यांची खात्याअंतर्गत दिलेल्या एमपीएससी परीक्षेत यश संपादन करुन पीएसआय पदावर निवड झाली. त्यांच्या या उत्तुंग यशानिमित्त धरणगावकरांच्यावतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला त्या प्रसंगी ते बोलत होते. येथील विश्रामगृहात हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

वाचनालयास पुस्तके भेट
गावातील तरुणांना स्पर्धापरीक्षेची तयारी करता यावी म्हणून त्यांनी वाचनालयास दहा हजार रु.ची पुस्तके भेट देण्याचे जाहीर केले. गांवाच्या लोकांनी केलेल्या सत्काराने आपण भारावून गेलोय असं तो म्हणाला. पंकज हा पी.आर.हायस्कूलचा माजी विद्यार्थी आहे. कार्यक्रमाचे सूत्र संचलन रवी महाजन यांनी तर आभार प्रदर्शन गुलाब मराठे यांनी केले.

यांची होती उपस्थिती
या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, प्रा.डी.आर.पाटील, भानुदास विसावे, डॉ.संजीवकुमार सोनवणे, प्रा.बी.एन.चौधरी, आर.डी.माळी, नपा विरोधीपक्ष गट नेते कैलास माळी, माजी गटनेते दिपक वाघमारे, माजी नगरसेवक मधुकर रोकडे, अ‍ॅड. भोलाणे, मोहन पाटील, प्रा.अजय सपकाळे, साईमतचे विजय वाघमारे, शरदकुमार बन्सी, डी.एस.पाटील, कडूभाऊ महाजन, धर्मराज मोरे, जितेंद्र महाजन, मधुकर रोकडे, भगिरथ माळी, नगरसेवक पप्पूभाऊ भावे, अ‍ॅड.शरद माळी, नगरसेवक विलास महाजन, अभिजित पाटील, कल्पेश महाजन आदी.