पिस्तुल बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक

0

चाकण : बेकायदेशीर पिस्तुल बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे असा एकूण 50 हजार 400 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई चाकण पोलिसांनी गुरुवारी रात्री केली.

आकाश भगवान हुरसाळे (वय 25, रा. मंदोशी, ता. खेड), हृषीकेश दिलीप कलाटकर (वय 21, रा. कोरेगाव बुद्रुक, ता. खेड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, खालुंब्रे गावच्या हद्दीत हुंदाई कंपनीसमोर दोनजण पिस्तुल घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक संजय निलपत्रेवार, पोलीस हवालदार सुरेश हिंगे, शिवानंद स्वामी, पोलीस नाईक संदीप सोनवणे, संजय जरे, हनुमंत कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल निखिल वर्पे, मच्छीन्द्र भांबुरे यांच्या पथकाने सापळा रचून आकाश आणि हृषीकेश यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे असा एकूण 50 हजार 400 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. अटक केलेल्या आरोपींपैकी आकाश हुरसाळे याच्यावर खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. आरोपींकडून जप्त केलेली शस्त्रे त्यांनी बिहार मधून आणली असल्याची कबुली दिली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.