Private Advt

पिस्तुलच्या धाक दाखवून हॉटेल व्यवस्थापकाला धमकी

0
भोसरी : हॉटेल समोरील गार्डनची जागा वापरायची नाही, ती जागा वापरल्यास तुम्हाला बघून घेईन, असे म्हणत स्वतःचे परवानाधारक शस्त्र घेऊन एका इसमाने हॉटेल व्यवस्थापकाला मारण्याची धमकी दिली. हा प्रकार इंद्रायणीनगर येथील पूजा रेस्टॉरंट अँड बार येथे घडला. यशवंत बाबासाहेब बाबर (रा. इंद्रायणी नगर, भोसरी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हॉटेलसमोरच्या जागेचा वाद
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्रायणी नगर येथे पूजा रेस्टॉरंट अँड बार आहे. या हॉटेलमध्ये अशोक शेट्टी हे व्यवस्थापक म्हणून काम करतात. आरोपी बाबर याने 14 ऑगस्ट रोजी हॉटेलमध्ये येऊन शेट्टी यांना ‘हॉटेलसमोरील गार्डनची जागा वापरायची नाही. ती जागा वापरल्यास तुम्हाला बघून घेईन.’ अशी धमकी दिली. तसेच स्वतःजवळ असलेली परवानाधारक रिव्हॉल्वर हातात घेऊन परिसरात दहशतीचे वातावरण तयार केले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाटील तपास करीत आहेत.