पिळोद्याच्या इसमाचा भुसावळातील तापी पात्रात मृत्यू

0

भुसावळ- रुग्णालयात दाखल झालेल्या मुलाच्या भेटीनंतर घराकडे निघालेले पिता बेपत्ता झाल्यानंतर त्यांचा मृतदेहच तापी नदीपात्रात आढळल्याने खळबळ उडाली आहे. दिनकर तापीराम वायकोळे (48, मूळ रा.पिळोदा, ता.यावल, ह.मु.आनंद नगर, भुसावळ) अये मयत इसमाचे नाव आहे. रविवारी सकाळी 10 वाजेच्या पूर्वी तापी नदीच्या पात्रात मृतदेह आढळला. सिमेंट फॅक्टरीत काम करणारे दिनकर वायकेळे हे रुग्णालयात दाखल आपल्या मुलाला भेटल्यानंतर घराकडे निघाले मात्र घरी परतले नसल्याने त्यांचा शोध सुरू होता. रविवारी सकाळी तापी नदी पात्रात एका व्यक्तीचा मृतदेह पडला असल्याची माहिती मिळाल्यावरून निलेश अत्तरदे (सावदा) यांनी तापी नदीकडे धाव घेतली असता मृतदेह दिनकर वायकोळे यांचा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिस उपनिरीक्षक के.टी. सुरळकर व शहर पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला. निलेश अत्तरदे यांनी दिलेल्या माहितीवरून शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Copy