पिकअप व्हॅनच्या धडकेत आमदार जखमी

0

जालना । आमदार नारायण कूचे यांच्या स्कॉर्पिओ गाडीला पिकअपने धडक दिल्याने झालेल्या अपघातात आमदार कूचे यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली. पिकअपमधील 5 जणांसह चालकदेखील जखमी झाला आहे. बदनापूर मतदार संघाचे भाजपचे आमदार नारायण कूचे यांच्या स्कॉर्पिओ गाडीलाविरूद्ध दिशेने येणार्‍या पिकअपने धडक दिली. यामुळे झालेल्या अपघातात आमदार कूचे यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे.

शहरातील संभाजी उद्यानसामोरील घटना
शहरातील संभाजी उद्यानाच्या गेटसमोर सोमवारी दुपारी ही घटना घडली. आमदार नारायरण कुचे हे आपल्या स्कॉर्पिओ (एमएच-20-बीएन-7105) गाडीने औरंगाबादहून अंबडकडे जात असतांना विरुद्ध दिशेने येणार्‍या पिकअप (एमएच 21-4105) आणि स्कॉर्पिओची शहरातील संभाजी उद्यानासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात आमदारांसह अन्य पाच जण व पिकअपचा चालक जखमी झाला. या अपघातात नवनाथ थुबे (वय 19), राजू शेळके (वय 21), सुदर्श नन्नवरे (वय 19), युवराज शेळके (वय 17) असे जखमी झालेल्यांचे नाव आहे. नितीन राठोड (वय 17) व अमोल राठोड (वय 23, रा. दहिफळ खांदारे ता. मंठा) यांचा समावेश आहे. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.