Private Advt

पिंप्राळ्यात दुचाकीचे नुकसान करीत दोघा भावांना ठार मारण्याची धमकी

जळगाव : पिंप्राळ्यातील गुरूदत्त कॉलनीत तीन दुचाकींचे नुकसान करून दोन भावंडाला शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

हटकल्याचा राग आल्याने दुचाकींचे नुकसान
विजय अभयसिंग चव्हाण (31ग, रा.गुरूदत्त कॉलनी, पिंप्राळा जळगाव) हा तरूण आपल्या कुटुंबिंयांसह वस्तव्याला आहे. शनिवार, 18 जून रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास प्रकाश कोळी (रा.मढी पिंप्राळा), महेंद्र समाधान सपकाळे उर्फ दादू (रा.बुध्दनगर, पिंप्राळा), उमाकांत वाघ (रा.मिराबाई नगर, पिंप्राळा) आणि एक अनोळखी तरूण असे चार जण विजय चव्हाण यांच्या घरीसमोर येवून जोर-जोरात आरडाओरड करीत होते. याबाबत विजय चव्हाण याने हटकले असता चौघांनी घराच्या खिडक्या, दरवाजे यांचे नुकसान केले तर तीन मोटारसायकलीचे आदळआपट करून नुकसान केले तर विजय चव्हाण व त्याच्या भावाला चौघांनी शिवीगाळ व जीवेठार मारण्याची धमकी दिली.

चौघांविरोधात गुन्हा दाखल
याबाबत सोमवार, 19 जून रोजी सकाळी रामानंदनगर पोलिस ठाण्यात प्रकाश कोळी (रा.मढी पिंप्राळा), महेंद्र समाधान सपकाळे उर्फ दादू (रा. बुध्दनगर, पिंप्राळा), उमाकांत वाघ (रा.मिराबाई नगर, पिंप्राळा) आणि एक अनोळखी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास महिला पोलिस कॉन्स्टेबल श्रध्दा रामोशी करीत आहे.