Private Advt

पिंप्राळ्यात चोरट्यांनी 33 हजारांचा ऐवज लांबवला

जळगाव : पिंप्राळा परीसरातील शिंदे नगरातील घरातून सोन्याचे दागिने व रोकडसह 33 हाजरांचा ऐजव अज्ञात चोरट्यांनी लांबवला.

रामानंद नगर पोलिसात गुन्हा
कडोबा त्र्यंबक सुर्यवंशी (46, रा.शिंदे नगर, पिंप्राळा, जळगाव) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. बुधवार, 13 एप्रिल रोजी सायंकाळी सहा ते 17 एप्रिल सकाळी 11 वाजेच्या दरम्यान, अज्ञात व्यक्तीने त्यांच्या बंद घरातून 23 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि 10 हजार रुपयांची रोकड मिळून 33 हजारांचा मुद्देमाल लांबवला. या प्रकरणी कडोबा सूर्यवंशी यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर बुधवार, 20 एप्रिल रोजी दुपारी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार संजय सपकाळे करीत आहे.