पिंप्राळा हुडको येथे विवाहितेची गळफास घेवून आत्महत्या

0

जळगाव: शहरातील पिंप्राळा हुडको येथे कुटुंबिय घरात झोपलेले असतांना मध्यरात्री सुवर्णा आनंदा चौधरी (वय-35) या विवाहितेने घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याचा प्रकार शुक्रवार, 11 डिसेंबर रोजी सकाळी सकाळी उघडकीस आला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की, आनंद श्रावण चौधरी (वय-32) रा. पिंप्राळ हुडको हे पत्नी सुवर्णा आनंदा चौधरी (वय-35), आई इंदूबाई चौधरी आणि दोन मुलांसह राहतात. आनंद चौधरी हे व्यवसायाच्या निमित्ताने धुळे येथे कामासाठी गेले होते. घरी पत्नी सुवर्णा आणि आई इंदूबाई हे दोघेच होते. मध्यरात्री सुवर्णा चौधरी यांनी सर्वजण झोपले असतांना दोरीने छताला गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार सकाळी इंदूबाई यांच्या लक्षात आल्याने त्यांनी हंबरडा फोडला. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच रामानंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप परदेशी, पोलीस कॉन्स्टेबल सुनील पाटील, पोलीस कॉन्स्टेबल रेवानंद साळुंखे यांनी घटनास्थळ गाठले. घटनेचा पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. याठिकाणी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप परदेशी करीत आहे.

Copy