Private Advt

पिंप्राळा हुडकोत किरकोळ कारणावरून दोघांना मारहाण

जळगाव : शहरातील पिंप्राळा हुडको परीसरात ईलेक्ट्रिक तारांवर वायर टाकण्याच्या कारणावरून दोघांना शिविगाळ करून मारहाण करण्यात आली. या प्रकरणी दोन जणांवर रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दोघांविरोधात रामानंद नगर पोलिसात गुन्हा
सैय्यद जहुरअली कमरअली (44, रा.बिल्डींग नं. 18, पिंप्राळा हुडको जळगाव) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. कलरकाम करून आपला उदरनिर्वाह करतात. बुधवार, 18 मे रोजी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास शकील शेख हुसेन यांच्या गच्चीवरून त्यांनी ईलेक्ट्रिक तारांवर आकोडा टाकून वायर नेली होती. यामुळे झालेल्या वादातून सैय्यद जहुरअरली कमरअली आणि त्यांचा पुतण्या फरहान परवे शेख यांना शकील शेख हुसेन आणि आलमगीर शेख हुसेन यांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तर एकाने कटरने वार करून सैय्यद जहुलअली यांना दुखापत केली. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याबाबत सैय्यद जहूरअली कमरअली यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर संशयीत आरोपी शकील शेख हुसेन आणि आलमगीर शेख हुसेन यांच्याविरोधात रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक अनमोल पटेल करीत आहे.