पिंप्राळा हुडकोत अतिक्रमण वाढले

0

जळगाव । दुध फेडरेशन येथील झोपड्डीधारकांना रेल्वे प्रशासनाने निष्कसीत केले होते. या झोपडपट्टीधारकांपैंकी काहींचे पुर्नवसन महानगर पालिकेतर्फे पिंप्राळा हुडको येथे करण्यात आलेले आहे. शुक्रवार 3 फेब्रुवारी रोजी पिंप्राळा हुडको येथे या स्थलांतरीत करण्यात आलेल्या दूध फेडरेशन येथील झोपडपट्टीधारक नागरिकांची तपासणी करण्यात आली. अतिक्रमण विभागाच्या पथकाने केलेल्या तपासणीत तेथे गैरकारभार झालेला आढळून आला.

रहिवासी घरांचा व्यापारासाठी वापर
महानगर पालिकेचे पथक पिंप्राळा हुडको येथे जावून घरकूल धारकांच्या पावत्या तपासत असतांना काही ठिकाणी नाव एकाचा रहीवासी दुसराच असा प्रकार पहावयास मिळाला. रहीवासासाठी दिलेल्या जागांमध्ये काहींनी किराणा दुकान, पिठाची गीरणी, कॉम्प्युटर दुकान, भंगार गोडावून, सेंट्रींग कामाच्या साहित्याचे गोडावून केलेले अशा 20 अनाधिकृत ठिकाणे आढळून आली आहेत. मरहिवासासाठी दिलेल्या या घरांमध्ये केवळ 3 ते 4 व्यक्तींकडे महानगर पालिकेने दिलेले ओळखपत्र आढळून आलेले आहे. ही घरे दुसर्‍या व्यक्तींना हस्तांतरीत करण्यात येत नसतांना काही रहिवाशांनी दुसर्‍या व्यक्तींना आपले घर विक्री केले असल्याचे आढळून आले आहे. अशा रहिवाशांनी व्यापारी वापर केल्याने त्यांच्यावर महानगर पालिकेचे वकील अ‍ॅड. केतन ढाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे महानगर पालिका प्रशासनाने सांगितले आहे.