Private Advt

पिंप्राळा हुडकोतील प्रौढाने किराणा दुकानात घेतला गळफास

जळगाव : शहरातील पिंप्राळा हुडको भागातील प्रौढाने किराणा दुकानात सोमवारी सकाळी आठ वाजता गळफास घेवून आत्महत्या केली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख शाबीर शेख कादीर (55, पिंप्राळा हुडको, जळगाव) असे मयताचे नाव आहे. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही.

पहाटेच्या सुमारास आत्महत्या
शेख शबीर शेख कादीर हे पिंप्राळा हुडको येथे पत्नी व दोन मुलांसह वास्तव्यास होते व किराणा दुकान चालवून उदरनिर्वाह करत होते. सोमवार, 18 एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता शेख शबीर हे उठल्यानंतर नमाज पठणस जातो, असे सांगून घराबाहेर पडले. बराच वेळ झाल्यानंतर ते घरी आले नाही म्हणून त्यांचा मुलगा याने किराणा दुकानात जावून पाहणी केली असता शेख शब्बीर यांनी दुकानातच गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप कळू शकले नाही. नातेवाईकांनी तातडीने शेख शब्बीर खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास निलेश पाटील व अजय सपकाळे करीत आहे.