पिंपळे गुरव येथील 25 वर्षीय महिलेला कोरोना

0

पिंपरी:  पिंपळे गुरव परिसरातील 25 वर्षीय महिलेला करोनाची लागण झाली आहे. यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या करोना बाधितांची संख्या ४६ वर पोचली आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत रविवारी शहरातील पिंपळे गुरव परिसरात एक करोना बाधित रुग्ण आढळला आहे. .

सध्या पिंपरी चिंचवड शहरात ३८ करोना बाधित रुग्णावर उपचार सुरू आहेत. तर अन्य आठ जणांवर पुण्यातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहे. आत्तापर्यंत १५ रुग्ण करोना मुक्त झाले आहेत. तर एकाचा यापूर्वी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या ६२ गेली आहे.

Copy