पिंपळेगुरव, दापोडीतील पाणीपुरवठा विस्कळीत

0

पिंपरी चिंचवड : पिंपळे सौदागर पुलाजवळ चिंचवड ग्रॅव्हिटी जलवाहिनी फुटल्याने गळती सुरु झाली आहे. दुरुस्तीसाठी पाणी बंद केले आहे. त्यामुळे पिंपळेगुरव, दापोडी या पूर्ण भागाचा आणि नव्या सांगवीच्या काही भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून या भागात सायंकाळी पाणी येणार नसल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामदास तांबे यांनी दिली.

पाणी जपून वापरण्याचे आवाहन…

पिंपळे सौदागर पुलाजवळील चिंचवड ग्रॅव्हिटी जलवाहिनी सकाळी फुटली. त्यामुळे पाण्याची गळती सुरु झाली होती. याबाबत पाणीपुरवठा विभागास माहिती मिळाल्यानंतर तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. जलवाहिनीचे पाणी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे पिंपळेगुरव, दापोडीच्या पूर्ण भागाचा व नव्या सांगवीच्या काही भागाचा दुपार व संध्याकाळचा पाणी पुरवठा विस्कळीत राहण्याची शक्यता आहे. दुरूस्तीनंतर या भागातील पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. पाणी पुरवठा ज्या भागात होणार नाही, त्या नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

Copy