पिंपळगाव-शिंदाड गटात भाजपाची प्रचारार्थ रॅली

0

पिंपळगाव । पिंपळगाव -शिंदाड जिल्हा परिषद गटातील मधुकर सुकदेव पाटील (काटे) व पंचायत समितीच्या पिंपळगाव गणातील रत्नाप्रभा अशोक पाटील व सिंदाड गणातील रेखा नरेंद्र पाटील यांच्या प्रचाराची रॅलीला पिंपळगाव, चिंचपुरे, भोजे, सार्वे पिंप्री, सातगाव (डोंगणी), वाडी, शेवाळे, निंभोरी, वाणेगाव, राजुरी, डांभुर्णी, पिंप्री, वडगाव, अटळगाव या गावांमधून रॅली काढून केंद्र शासन व राज्य शासन जिल्हा परीषदच्या माध्यमातून केलेल्या विकासाच्या कामाची माहिती देत गोर गरीबांचा व शेतकरी कष्टकरी यांच्यासाठी असून त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी गटात चौफेर विकास करण्याचे ठरविले आहे. त्यांनी या गटात गणात जोरदार आघाडी घेतली असून संपूर्ण गटात भाजपामय वातावरण निर्माण दिसून येत असून भाजपाच्या रॅलीस चांगलीच प्रतिसाद मिळत असल्याचे गटाचे उमेदवार मधुकर पाटील यांनी जनशक्तिशी बोलतांना सांगितले.

भाजपच्या प्रचार रॅलीत कार्यकर्त्यांचा सहभाग

प्रचार रॅलीत सहभागी झालेले गटातील व गणातील व मतदार बंधू व भाजपाचे कार्यकर्ते डॉ. शांतीलाल तेली, देविदास पाटील, वसंत गीते, संतोष काळे, विजय काळे, विजय पाटील, काशिनाथ पाटील, स्वप्नील पाटील, मुस्ताक तडवी, राजू तडवी, समीर तडवी, विजय पाटील, अशोक पाटील, रमेश पाटील, आत्माराम पाटील, चंद्रकांत पाटील, ईश्‍वर पाटील, दिपक पाटील, गजानन पाटील, राजू पाटील, अतुल पाटील व महिलांसह पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सहभाग नोंदवला.