Private Advt

पिंपळगावच्या विवाहितेची आत्महत्या

भुसावळ : तालुक्यातील पिंपळगाव खुर्द येथील ज्योती अनिल सपकाळे (28) या विवाहितेने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शनिवार, 31 जुलै रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास उघडकीस आली. वरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. ज्योती इंगळे या विवाहितेने घरात कोणीही नसतांना घराच्या पत्राच्या छताच्या पाईपाला दोरीच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केली. वरणगाव ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी क्षितीजा हेडवे यांनी शवविच्छेदन केले. मयत विवाहितेच्या पश्चात मुलगी, मुलगा व पती असा परीवार आहे. तानसिंग कोळी यांच्या खबरीनुसार वरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सहा.निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास कॉन्स्टेबल नावेद अली सैय्यद करीत आहेत.