पिंपळगावच्या विद्यार्थ्याचा सर्पदंशाने मृत्यू

A student from Pimpalgaon died of snakebite पाचोरा : वडिलांसोबात शेतात काम करणार्‍या पिंपळगाव हरेश्वर येथील गौरव सुनील बडगुजर (18) या बारावीत शिकणार्‍या विद्यार्थ्याचा सर्पदंशाने मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना मंगळवार, 4 ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली.

आठ दिवसांची झुंज ठरली अपयशी
गौरव हा मंगळवार, 26 सप्टेंबर 2022 रोजी त्याच्या वडिलांसोबत शेतातील काम करण्यासाठी गेल्यानंतर त्यास सर्पदंश झाला. त्यानंतर शेतात चक्कर येऊन पडल्यानंतर त्यास पिंपळगाव (हरेश्वर) येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर प्रथमोचार करण्यात आले व पाचोरा येथे खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. खाजगी रुग्णालयात आठ दिवस मृत्यूशी झुंज देत असतांनाच मंगळवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास गौरवचा मृत्यू झाला.