पिंपळकोठा येथे दोन हात भट्ट्या उद्ध्वस्त; एरंडोल पोलिसांची कारवाई

0

एरंडोल। तालुक्यातील पिंपळकोठा बु. व खु.येथील गावठी दारूच्या दोन हातभट्ट्यावर एरंडोल पोलिसांनी आज सकाळी सहा वाजता धाडी टाकून सतरा हजार दोनशे रुपयांची गावठी दारूचे साडेसहाशे लिटर रसायन व चाळीस लिटर दारू नष्ट केली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळकोठा बु.येथील लताबाई मंगल भिल हिचे राजु बाबुलाल पाटील यांच्या शेता जवळील पाटचारी शेजारील बाभळीच्या झाडाखाली असलेल्या हातभट्टी वर धाड घातली असता बारा हजार सातशे रुपये किमतीचे 500 लिटर रसायन व 20 लिटर दारू पकडून नष्ट करण्यात आली.

दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल
दुसर्‍या गुन्ह्यात संजय लक्ष्मण नाईक रा.पिंपळकोठे खु.यांचीही हातभट्टी वरील ठिकाणी पोलिसांना आढळुन आली व त्यात चार हजार पाचशे रुपये किमतीचे 150 लिटर रसायन व 20 लिटर दारू पकडून नष्ट करण्यात आली. याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला पो.कॉ.संदीप अशोक सातपुते व पो.कॉ.राजू पितांबर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर कारवाई प्रसंगी पोलीस निरीक्षक बाळासाहेब केदारे, पोलीस उपनिरीक्षक एम.एस.बैसाणे, हे.कॉ.राजेंद्र पाटील, सुधाकर लहरे, श्रीराम पाटील, बापू पाटील, संदीप सातपुते, राजेंद्र कोठावदे हजर होते.