पिंपरी-चिंचवड पुन्हा ‘रेडझोन’मध्ये मात्र..

0

पिंपरी : कोरोणाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असल्याने पिंपरी-चिंचवड शहराचा पुन्हा रेडझोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे नियमात काही बदल होतील का? असा प्रश्न पडला असेल मात्र नियमात बदल केला जाणार नाही. पण, एखाद्या कार्यालयात किंवा विभागात जास्त रुग्ण आढळून आल्यास ती काही दिवसांसाठी बंद करण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. दरम्यान आज उपमुख्यमंत्री पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार पिंपरी-चिंचवड शहर दौऱ्यावर आहेत. त्यामुळे ते काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात दररोज एक हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळून येत असल्याने सध्या रुग्णसंख्या २५ हजार ४९५ झाली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे शहराचा समावेश राज्य सरकारने शहराचा समावेश रेडझोनमध्ये केला आहे. पिंपरी-चिंचवड शहर हे औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचे असल्याने चिंता वाढली आहे.