पिंपरी चिंचवडला पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाखाली भाजपाचा चक्काजाम

पिंपरी चिंचवड- महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपतर्फे शनिवारी राज्यभर आंदोलन करण्यात आले. पिंपरीतही भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलनात कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करून ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या लढ्याला सुरुवात करण्यात आली. पिंपरीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, पिंपरी चिंचवड मनपाचे पक्षनेते नामदेव ढाके यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात महापालिकेतील पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका तसेच भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान, पिंपरी-चिंचवडमध्ये होणार्‍या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
राज्य शासनाची खेळी, ओबीसी आरक्षणाचा बळी ओबीसीके सन्मान मे, भाजप मैदान मे, ऊठ ओबीसी जागा हो, एकजुटीचा धागा हो, निर्वाचित निवडणूक निरस्त करून ओबीसी संपवायचा राजकीय डाव?, असे फलक कार्यकर्त्यांनी हातामध्ये घेतले होते.