Private Advt

पिंपरी-चिंचवडमध्ये राहणीमान सर्व्हेक्षणाचा प्रारंभ

0

देशभरातील 114 शहरांचा या सर्वेक्षणात सहभाग

नागरिकांनो मतं नोंदवा; आयुक्त श्रावण हर्डीकर यांची पत्रकार परिषदेत माहिती

पिंपरी चिंचवड ः पिंपरी-चिंचवड शहराचे ‘राहणीमान सर्व्हेक्षण’ केले जाणार आहे. त्यात शहरातील आरोग्य, पाणी पुरवठा, स्वच्छता, शिक्षण, गृहनिर्माण, विकास, आर्थिक संधी अशा तत्सम सेवासुविधांच्या संदर्भात नागरिकांचे मत नोंदवून घेण्यात येणार आहे. राहणीमानाच्या दृष्टीकोणातून पिंपरी-चिंचवड शहर देशभरातील शहरांच्या तुलनेत कितपत निरोगी आणि योग्य शहर आहे. याची पडताळणी करून शहराला निर्देशांक दिला जाणार आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

शहराचे मार्किंग ठरणार…
केंद्र सरकारकडून देशभरातील शहरांचा राहणीमान दर्जा सुधारण्यासाठी राहणीमान सर्व्हेक्षण (एरीश ेष श्रर्ळींळपस ळपवशु) करण्यात येणार आहे. त्यासाठी राहणीमान सर्वेक्षण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सर्व्हेक्षणातून राहण्यायोग्य शहरांची यादी जाहीर केली जाणार आहे. त्यासाठी संबंधीत स्थानिक स्वराज्य संस्थेने शहरात राबविलेल्या पायाभूत सुविधा तपासण्यासाठी तेथील लोकांची मते जाणून घेतली जाणार आहेत. दहा टक्के मते पॉझीटिव्ह आल्यास शहराचे मार्कींग ठरणार आहे. या उपक्रमात देशभरातील 114 शहरांचा सहभाग आहे.

महाराष्ट्रातून पिंपरी-चिंचवडचा समावेश…
महाराष्ट्रातील 12 शहरांचा समावेश आहे. यात पिंपरी-चिंचवडचा देखील समावेश आहे. हे सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी महापालिकेने शहरातील नागरिकांना उपलब्ध करून दिलेल्या सुविधा, शहराचा विकास, राहणीमान, शिक्षण, पाणी, आरोग्य, व्यवसाय यासंदर्भात आपले मत नोंदवायचे आहे, अशी माहिती आयुक्त हर्डीकर यांनी दिली. पत्रकार परिषदेत स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, नगरसेविका सुलक्षणा धर, संगणक अधिकारी निळकंठ पोमण, जनसंपर्क अधिकारी आण्णा बोदडे आदी उपस्थित होते.

राहणीमान सर्व्हेक्षणात केंद्र सरकारकडून शहराचा ‘डाडा’ तयार करण्याचे काम सुरू आहे. आजपासून या उपक्रमाला सुरूवात झाली आहे. 1 ते 29 फेब्रुवारी दरम्यान हा उपक्रम राबविला जात आहे. त्यामध्ये नागरिकांना आपले मत नोंदवायचे आहे. त्यासाठी नागरिकांना राहणीमान सर्व्हेक्षण 2019 चा ‘क्युआर कोड’ स्कॅन करावा लागेल. तसेच, नागरिकांनी हीींिीं://शेश्र2019.ेीस/लळींळूशपषशशवलरलज्ञ या संकेतस्थळावर जाऊन ‘क्युआर कोड’ स्कॅन करावा. त्यानंतर महाराष्ट्र राज्य निवडून त्यानंतर पिंपरी-चिंचवड शहर निवडावे. आपल्याला समोरील मुद्दे वाचून त्यानुसार आपले मत नोंदवावयाचे आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी आपले मत नोंदविल्यास राहण्यायोग्य शहर सर्व्हेक्षणातील शहरांच्या यादीमध्ये पिंपरी-चिंचवडचा निर्देशांक उचांवणार आहे.

– श्रावण हर्डीकर, आयुक्त – पिंपरी-चिंचवड, मनपा.

पिंपरी-चिंचवड शहराच्या निवडीसाठी केंद्र सरकारचा अतिशय कौतुकास्पद असा हा उपक्रम आहे. त्यामध्ये जास्तीजास्त नागरिकांनी आपले मत नोंदवून शहराचा निर्देशांक वाढवावा.

  • उषा ढोरे, महापौर – पिंपरी-चिंचवड मनपा.