पिंपरी-चिंचवडमध्ये नव्याने तीन जणांना कोरोनाची लागण

0

पिंपरी – जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. अशातच भारतात कोरोनाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील कोरोना ग्रस्तांचा आकडा 2 हजाराजवळ पोहोचला आहे. पुण्यातही कोरोनाच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. दरम्यान पिंपरी चिंचवड शहरात नव्याने तीन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. रविवारी रात्री उशिरा आणखी तीन महिला करोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला. यामुळे सध्या करोना बाधितांची संख्या १८ वरून २१ वर गेली आहे. काल रविवारी शहरातील करोनाचा पहिला बळी गेला. तर गेल्या चार दिवसांपासून करोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. रविवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत दोन करोना बाधीत रुग्ण नव्याने आढळले होते. मात्र रविवारी रात्री उशिरा आलेल्या अहवाल आणखीन तीन महिला करोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे रविवारी एकाच दिवसात करोना बाधितांच्या संख्येत पाचने वाढ झाली.

सध्या पिंपरी चिंचवड शहरात २१ करोना बाधित रुग्ण आहेत. तर १२ रुग्ण यापूर्वीच करोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. शहरात एकूण करोना बाधितांची संख्या ३४ वर गेली आहे