पिंपरीत डॉक्टर पत्नीचा छळ

0
रुग्णालय उभारण्यासाठी माहेरातून पैसे आणण्याची मागणी
पिंपरी-चिंचवड : नवीन रुग्णालय बांधण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत डॉक्टर पत्नीचा डॉक्टर पतीने मानसिक आणि शारीरिक छळ केला. हा प्रकार 11 डिसेंबर 2014 पासून ते 28 फेब्रुवारी 2018 या कालावधीमध्ये अजमेरा पिंपरी आणि रावेर, जि. जळगाव येथे घडला. याप्रकरणी 28 वर्षीय डॉक्टर महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार डॉक्टर पतीसह, सासू आणि सासरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजमेरा कॉलनीतील डॉक्टर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर 2014 मध्ये फिर्यादी महिलेचे अजमेरा पिंपरी येथील आरोपी डॉक्टर सोबत लग्न झाले. लग्नावेळी महिलेच्या घरच्यांनी तिला 18 तोळे सोन्याचे दागिने दिले. त्यानंतर आरोपी पतीला रुग्णालय बांधण्यासाठी वेळोवेळी 10 लाख रुपये दिले. त्यानंतर देखील डॉक्टर महिलेच्या सासरच्यांनी तिच्याकडे रुग्णालय बांधण्यासाठी आणखी पैसे आणण्याची मागणी केली. यासाठी महिलेने विरोध केला असता तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला. तसेच तिला माहेरच्यांनी लग्नात दिलेले 18 तोळे सोन्याचे दागिने आरोपींनी ठेऊन घेतले. यावरून डॉक्टर महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली. आरोपींना अदयाप अटक करण्यात आली नसून पिंपरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे तपास करीत आहेत.
Copy