पिंपरीत झाला एनजीओजचा मार्गदर्शन मेळावा

0

निधीसाठी मुद्देसुद प्रकल्प अहवाला गरजेचा
पिंपरी : विविध सामाजिक संस्था व सीएसआरच्यावतीने एनजीओचा मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास सामाजिक संस्थांचा व कंपनीमधील प्रतिनिधी यांचा सहभाग उत्स्फूर्त होता. पिंपरीत हा मेळावा पार पडला असून यावेळी प्रकल्प लिखाण त्याची प्रक्रिया संदर्भात मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, विलोमाथर प्लान्टचे एम.डी.हेमंत वाटवे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे, राजीव भावसार, सीएसआर संस्थेचे अधिकारी आदी सामाजिक संस्थांचे सभासद उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत चिंचोळीकर, कोर कमिटी मेंबर सी.एस.आर. व चॅरिटी कंपनी गव्हर्नन्स इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी, सेक्रेटरीज ऑफ इंडिया यांनी सामाजिक संस्थानी सी.एस.आर. निधी घेण्यासाठी योग्य व मुद्देसूद प्रकल्प अहवाल बनवण्याची गरज असल्याची माहिती दिली. मागील वर्षी कंपनी सी.एस.आर. निधीबद्दल सविस्तर आकडेवारी व माहिती दिली.

सर्वांशी केली चर्चा
यावेळी हेमंत वाटवे म्हणाले की, सीएसआरबाबतची माहिती प्रत्येक कंपनीला सादर करावीच लागते. सरकारने निकष नियम ठरवून दिलेले आहेत. त्यासाठी कंपनीने सीएकडून मान्यता घेऊन करावाच लागतो. त्याची सामाजिक बांधीलकीसाठी (सीएसआर) असणारे नियम केंद्र सरकारने जाहीर केले. वर्षाला विशिष्ट नफा कमविणार्‍या कंपन्यांना सीएसआरवर निधी खर्च करण्याची सक्ती करण्यात आली आहे.
कंपन्यांनी त्यांच्या गेल्या तीन वर्षांतील नफ्याच्या सरासरी प्रमाणात किमान दोन टक्के रक्कम सीएसआरवर खर्च करण्याचे बंधन आहे. कंपन्यांना या क्षेत्राशी संदर्भात असलेल्या सर्वांशी चर्चा करून नियमांना अंतिम स्वरूप देण्यात आले आहे.

पालिका सहकार्य करेल
आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने कोणत्याही प्रकारचे सहकार्य लागले तर करु. यावेळी पालिकेच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्याची माहिती यावेळी दिली. सामाजिक संस्थाचे कार्य व सेवा अखंड सुरु राहण्यासाठी त्यांना मदत करु. यावेळी प्रविण लडकत, तुषार शिंदे व गणेश जवळकर यांचे विषेश मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनजंय शेडबाळे यांनी केले. आभार सूर्यकांत मुथियान यांनी मानले.

Copy