पिंपरीत किरकोळ वादातून तरुणाची हत्या

0

पिंपरी : किरकोळ वादातून तरुणावर वार करुन घटना भोसरी एमआयडीसीतील महात्मा फुलेनगर येथे शुक्रवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास खून करण्यात आल्याची घटना घडली. विनोद माताफीर गिरी (रा. महात्मा फुलेनगर झोपडपट्टी, भोसरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी दयाराम शितलप्रसाद गिरी, बाबुराम शितलप्रसाद गिरी आणि जयप्रकाश कृष्णा गिरी (सर्व रा. महात्मा फुलेनगर झोपडपट्टी, भोसरी) या आरोपींना अटक केली आहे.

विनोद आणि आरोपी एकाच गल्लीत राहतात. शुक्रवारी मध्यरात्री विनोद यांच्या घरासमोरील पाण्याच्या ड्रमला दयाराम याने लाथ मारली. यावरुन त्यांच्यात शिवीगाळ झाली व वाद वाढला. दरम्यान, विनोद यांच्यावर आरोपींनी चाकूने वार करत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये विनोद गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

मागील काही दिवसांपासूनही त्यांच्यामध्ये किरकोळ कारणावरुन वाद होत होते. शुक्रवारी रात्री हा वाद विकोपाला गेला. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी आरोपींना अटक केली असून अधिक तपास सुरु आहे.

Copy