पिंपरीतील वाहनचोराकडून चार दुचाकी, एक टेम्पो जप्त

0
पिंपरी पोलीस ठाण्याची कामगिरी
पिंपरी-चिंचवड : वाहन चोरी करणार्‍या एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून तब्बल पाच लाख रुपयांची वाहने जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई पिंपरी पोलिसांनी केली. या कारवाईमुळे चार वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. विनोद श्यामराव लोखंडे (वय 33, रा. मिलिंदनगर, पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या वाहन चोराचे नाव आहे.
पिंपरीत केली कारवाई
सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई विकास रेड्डी, विद्यासागर भोते यांना माहिती मिळाली की, पिंपरी परिसरात वाहनचोरी करणारा एका आरोपी पिंपरी मधील डेक्कन होंडा शोरूम समोर येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ असलेल्या मोटारसायकल बद्दल चौकशी केली असता त्याने ती मोटारसायकल चोरी केली असल्याचे सांगितले. त्यावरून त्याला अटक करून कसून चौकशी केली असता त्याने आणखी तीन मोटारसायकल आणि एक चारचाकी टेम्पो चोरला असल्याचे सांगितले. त्यानुसार त्याच्याकडून चार दुचाकी आणि एक चारचाकी टेम्पो असा एकूण पाच लाख रुपयांचा ऐवज जप्त केला. या कारवाईमुळे पिंपरी आणि वाकड पोलीस ठाण्यातील चार वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलीस पथक
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) रंगनाथ उंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अन्सार शेख, पोलीस कर्मचारी राजेंद्र भोसले, नागनाथ लकडे, राजू काकडे, महादेव जावळे, आदिनाथ सरक, संतोष भालेराव, उमेश वानखेडे, विद्यासागर भोते, अविनाश देशमुख, गणेश खाडे, गणेश करपे, विकास रेड्डी, विष्णू भारती, सोमेश्‍वर महाडिक, नामदेव राऊत यांच्या पथकाने केली.
Copy