पिंपरीतील तीन संख्ख्या भावांचा कोरोनामुळे एकापाठोपाठ एक मृत्यू

0

पिपरी: कोरोनाने अनेकांचे कुटुंब उद्धवस्त केले आहे. पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. पुणे जिल्ह्यातील रुग्णसंख्या ५६ हजाराच्या पुढे गेली आहे. पिपरी-चिंचवडमध्येही मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढले आहे. दरम्यान पिंपरीतील एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या भावांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. एकापाठोपाठ एक असे तीनही भावांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

एकत्र कुटुंबात राहणारे हे तीनही भावांचे वय ६० वर्षापेक्षा अधिक होते. चिंचवडच्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. उपचारादरम्यान त्यातील एकाला श्वसनाचा आजार बळावला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पाच दिवसाने दुसऱ्याचा तर त्यानंतरच्या दोन दिवसानंतर तिसऱ्या भावाचा मृत्यू झाला. अवघ्या दहा दिवसांच्या अंतराने तीन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Copy