पिंपरी-चिंचवडमधील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर; रस्त्यावर गर्दी

0

पिंपरी: गेल्या अडीच महिन्यांपासून राज्यात लॉक डाऊन सुरू होते. केंद्रासह राज्य सरकारने काही अटी- शर्तीसह लॉकडाऊन उठवण्यात आले आहे. लॉकडाऊन उठवल्यानंतर पिंपरी- चिंचवड मधील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. शहरातील रस्ते गर्दीने फुलू लागले आहेत.

राज्यशासनाने दिलेल्या सुधारित आदेशानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेने अनेक सवलती जाहीर केल्या. त्यानुसार, अडीच महिन्यांपासून बंद असलेले शहरातील उद्योगधंदे सुरू झाले. पालिकेचे कामकाज सुरू झाले. शहरांतर्गत पीएमपीची वाहतूक सेवा ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यात आली आहे.

गर्दी टाळण्याचे आवाहन सातत्याने करूनही भाजीमंडई, बाजारपेठा तसेच दुकानांमध्ये गर्दी होताना दिसत आहे. मध्यंतरी पिंपरी बाजारपेठ सुरू केल्यानंतर पाच दिवसांत पुन्हा बंद करण्यात आली होती. त्या आधी एकदा गर्दी उसळल्याने लाठीमार करण्याची वेळ पोलिसांवर आली होती.

Copy