पिंपरीगावात 20 लक्ष लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे उद्घाटन..!

0

पिंपरी :- पिंपरीगावातील पाण्याच्या टाकीच्या उभारणीमुळे पिंपरी परिसरातील पाण्याची समस्या दूर होण्यास मदत होईल असे मत महापौर माई ढोरे यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्र. 21 मधील पिंपरी वाघेरे येथील कै.अनुसयाबाई वाघेरे प्राथमिक शाळेच्या परीसरात नव्याने उभारण्यात आलेल्या 20 लक्ष लिटर क्षमतेच्या जलकुंभास माजी कार्यकारी अभियंता कै.दिलीप गुलाबराव कुदळे असे नामकरण करुन त्याचे उदघाटन महापौर माई ढोरे यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.

आज दुपारी झालेल्या या कार्यक्रमास नगरसदस्य संदिप वाघेरे, सहशहर अभियंता मकरंद निकम, माजी नगरसदस्य रंगनाथ कुदळे, जनसंपर्क अधिकारी रमेश भोसले, सामाजिक कार्यकर्ते सिदाजी गोलांडे, किसनराव कापसे, जयवंत शिंदे, सुदाम नाणेकर, दत्तोबा नाणेकर, रामचंद्र डोंबाळे, नंदकिशोर लपके, शांताराम शिंदे, दिलीप मुळे, अमर कापसे, नरहरी कापसे, संतोष कुदळे, संध्या कुदळे, रधुनाथ कुदळे आदी उपस्थित होते. यावेळी महापौर माई ढोरे म्हणाल्या, पिंपरी मधील या जलकुंभामुळे महिलांचा पाण्याचा प्रश्‍न मोठ्या प्रमाणात सुटणार असून त्याचा लाभ या परिसरातील नागरिकांना मिळणार आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहनही त्यांनी केले. नगरसदस्य संदिप वाघेरे म्हणाले की, पिंपरीमध्ये या जलकुंभासाठी वेळोवेळी पाठपुरावा करुन सर्व कामे महापालिकेकडून वेळेत करुन घेतले. यामुळे पिंपरी प्रभागातील नव्वद टक्के पाण्याचा प्रश्‍न सुटलेला आहे. या जलकुंभाची क्षमता 20 लक्ष लिटर्स असून 18 महिन्यात काम पुर्ण केले असून या प्रकल्पास सूमारे 19 कोटी 38 लाख खर्च आलेला आहे. पिंपरी येथील तपोवन मंदिर परीसरातील नागरीकांना यांचा मोठा लाभ होणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसदस्य संदिप वाघेरे यांनी केले. तर सूत्रसंचालन व आभार माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.

Copy