पासपोर्टसाठी अर्ज द्या पोस्टात

0

नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्रालयाकडून लवकरच एक महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवला जाणार आहे. या उपक्रमांतर्गत मार्च महिन्यापासून देशातील निवडक शहरांमध्ये पासपोर्ट काढण्यासाठी पोस्ट ऑफिसांमध्ये देखील अर्ज करता येणार आहे. पासपोर्ट कार्यालयांवरील कामाचा भार कमी करणे तसेच प्रक्रिया अधिक सोपी करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय हा उपक्रम राबविणार आहे.

परराष्ट्र मंत्रालय ही सुविधा पहिल्या टप्प्यात राजस्थान, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, कर्नाटक, झारखंडसह इतर काही राज्यांमध्ये उपलब्ध करून देणार आहे. या उपक्रमांतर्गत मार्च महिन्याच्या पूर्वार्धात देशभरातील शहरांमधील पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्टसाठी अर्ज दाखल करता येणार आहेत. या उपक्रमासाठी परराष्ट्र मंत्रालयाने सर्व तयारी केली आहे. देशभरात 89 पासपोर्ट सेवा केंद्र,तर पासपोर्ट कार्यालयांची संख्या 38 इतकी आहे.