पासपोर्टवर आता फक्त धारकाचेच नाव

0

नवी दिल्ली । पासपोर्टवर आता फक्त पासपोर्टधारकाचेच नाव लिहिले जाणार असून, आई-वडील वा पतीचे नाव या रकान्यातून कायमचे हद्दपार करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. यापूर्वीच पासपोर्टवर पतीचे वा वडिलांचे नाव लिहिणे महिलांकरिता बंधनकारक असणार नाही, असे मत सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिल्यानंतर विदेशी मंत्रालयाकडून हा रकानचा आता काढून टाकला जाणार आहे. पासपोर्ट विभागासंदर्भात काही नवे नियम आणि बदल करण्याबाबत नुकतीच दिल्लीतील विदेशी मंत्रालय विभागाची एक विशेष बैठक बोलावण्यात आली होती. त्यानुसार आता पासपोर्ट धारकाने आई-वडील तसेच महिलांनी वडील वा पतीचे नाव लिहिणे बंधनकारक असणार नाही. हा बदल सिंगल बालक असणार्‍यांकरिता, पुनर्विवाहित, घटस्फोटीत महिलांकरिता किंवा ज्या मुलींचे सावत्र वडील हेच कायद्याने पालक आहेत, अशा सर्वांनाच महत्त्वाचा ठरणार आहे.