पावसाच्या हजेरीमुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ

0

पुणे : शहरासह जिल्ह्यात सलग मंगळवार, बुधवारी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणाच्या पाणी साठ्यात किंचित वाढ झाली असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

गेल्या काही वर्षांत प्रथमच मोसमी पाऊस सक्रिय होण्याअगोदरच यंदा मोठय़ा प्रमाणात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाला असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणांच्या परिसरात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. मंगळवारी रात्री टेमघर धरण परिसरात ११ मिलिमीटर, वरसगाव धरण परिसरात २२ मि.मी., पानशेत परिसरात २४ मि.मी. आणि खडकवासला धरणक्षेत्रांत २६ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. तर, बुधवारी दिवसभरात म्हणजेच सकाळी आठ ते सायंकाळी पाच वार्जेयत टेमघर धरण क्षेत्रांत तब्बल १०३ मि.मी. आणि खडकवासला धरण परिसरात दहा मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. वरसगाव आणि पानशेत धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही दिवसभरात दमदार पाऊस पडला.

Copy