पाळधी येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत सोशल डिस्टिंगचा फज्जा

0

बँकेतील शिपायाची खातेधारकांसोबत अरेरावीची भाषा

पाळधी:- धरणगाव तालुक्यातील पाळधी गावात सेंट्रल बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. या शाखेत रोज खातेधारकांची पैसे काढण्यासाठी गर्दी होत आहे.या गर्दीत सोशल डिस्टिंगचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. एकीकडे पालकमंत्राच्या गावात कोरोना बाधित रुग्णांची संख्या आज ३१ वर पोचली आहे. दुसरीकडे त्यांच्याच गावात असणाऱ्या बँकेत रोज ग्राहकांची गर्दी होत असून त्या ठिकाणी सोशल डिस्टिंगचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचे चित्र रोज पहायला मिळत आहे. दुसरीकडे बँकेत कार्यरत असलेले शिपाई गणपत ठाकूर खातेधारकांसोबत आरेरावीची भाषा वापरत असल्याचे दिसून आले आहे.

माझे कुणी काही करू शकत नाही आले
सेंट्रल बँकेत शिपाई असलेले गणपत ठाकूर यांच्याविषयी खातेधारकांचा मोठ्या प्रमाणात रोष असल्याचे काही खातेधारकांनी सांगितले. ठाकूर हे काही खातेधारकांकडून पैसे घेऊन त्यांचा लवकर नंबर लावत असल्याचे सांगण्यात आले. या बाबत खातेधारक शिपाई ठाकूर यांना बोलायला गेले तर मी या ठिकाणी भरपूर वर्षांपासून काम करत आहे, तुम्हाला थांबायचे असेल तर थांबा, नाही तर घरी जा. माझे कुणी काही करू शकत नाही असे सांगितले जाते.

शिपायाची बदली करण्याची मागणी
या अगोदरसुद्धा बँकेत असलेले शिपाई गणपत ठाकूर यांच्याविषयी बँकेचे मॅनेजर यांच्याकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. परंतु मॅनेजरने या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्याचे सांगण्यात येत आहे. बँकेत रोज येणाऱ्या खातेधारकांची ठाकूर यांच्याकडून अडवणूक केली जात असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे. तरीसुद्धा बँकेचे मॅनेजर या विषयी मूग गिळून गप्प बसले आहेत. खातेधारकांसोबत शिपायाचे रोज भांडण होत आहे. कारण ठाकूर हे काही लोकांकडुन पैसे घेऊन त्यांचा नंबर लवकर लावतात असे सांगण्यात येत आहे.

सोशल डिस्टिंग हरवले

पाळधी गावात सेंट्रल बँकेची शाखा असून या ठिकाणी आजच्या घडीला मोजून २ कर्मचारी काम करत आहे. त्यात बँकेचे मॅनेजर स्वतः काम करतांना आढळून आले आहेत. पाळधी येथील सेंट्रल बँकेच्या शाखेत चांदसर, कवठळ, चोरगाव, पथराड, धारशेरी, झुरखेडा, रेल, लाडली, दोनगाव, फुलपाट, टहाकळी, अशा छोट्या मोठ्या गावातील जेष्ठ नागरिकांचे पेन्शन योजनेचे पैसे येतात. तसेच अनेकांचे खाते या ठिकाणी आहे. त्या मुळे या ठिकाणी रोजच सकाळी साडे आठ वाजेपासून नागरिक पैसे काढण्यासाठी गर्दी करतात. या गर्दीत सोशल डिस्टिंग हरवलेले दिसून येत आहे.

जवळच पोलीस स्टेशन
पाळधीतील सेंट्रल बँकेच्या शाखेजवळच पाळधी पोलिस स्टेशन आहे. रोज बँकेत इतकी गर्दी होत असताना त्यांचे सुद्धा या गोष्टीकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

Copy