पाल गणात माजी आमदार चौधरींचा ‘रोड शो’

0

रावेर । पंचायत समितीच्या पाल गणातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार देविदास हळपे यांच्या प्रचारार्थ माजी आमदार शिरीष चौधरी यांनी पालमध्ये रोड शो करुन गट व गणाच्या उमेदवारांना विजयी करण्याच आवाहन केले. पाल गावासह इतर खेड्यांमध्ये आज दिवसभर माजी आमदार शिरीष चौधरी यांनी होम टू होम प्रचार फेर्‍या काढून काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. ढोलताशांच्या गजरात वेगवेगळ्या गावांमध्ये रॅला काढल्या. त्यांच्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना आदिवासी भागात भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. तर ठिकठिकाणी उमेदवारांचे औक्षणसुध्दा करण्यात येत आहे.

पाल गणाच्या विकासासाठी कटीबद्ध
पाल गणातून काँग्रेस पक्षातर्फे मी निवडणूक लढवित असून येथील पाण्याच्या समस्या, गावरस्ते, शिवरस्ते, गटारी, काँक्रिटीकरण, पंचायत समितीच्या विविध योजना शेतकर्यांना मिळवून देणार. ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी मी येथून लढत आहे. जास्तीत जास्त विकासाचा ध्यास घेवून मी रिंगणात असल्याचे काँग्रेस पक्षाचे पाल गणाचे उमेदवार देविदास हळपे यांनी सांगितले.