पालिवाल समाजाची चोपडा शहरात शोभा यात्रा

0

चोपडा । अखिल भारतीय पालिवाल समाजाची येत्या एप्रिल महिन्यात कुलदेवी आशापुर्णा धाम देवगुराडीया महाकुंभ मेळावा मध्यप्रदेश येथे होत आहे. महाकुंभ मेळाव्या निमित्त समाज जागृती रथाचे शहरात बुधवारी 22 फेब्रुवारी रोजी आगमन होत आहे. पालिवाल समाजातर्फे शनिवारी झालेल्या बैठकीत पालिवाल महाकुंभ 2017 निमित्त भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या शोभा यात्रेत माँ आशापुर्णा धाम येथून आलेल्या समाज जागृती रथाची मिरवणूक यात्रा काढण्यात येणार आहे.

चोपडा पालिवाल समाज अध्यक्ष अजय पालिवाल यांनी दिलेल्या महिती नुसार बुधवारी 22 फेब्रुवारी रोजी शहरातील गायत्री मंदिरातून सकाळी 9 वाजता शोभा यात्रा निघणार असून गांधीचौक, कचेरी रोड, चावडी परिसरातून मेन रोड मार्गे शोभा यात्रा शनी मंदिर येथे समाप्त होणार आहे. पालिवाल समाज महिला मंडळ आणि पालिवाल युवा मंच यांचा हि या नियोजन बैठकीत समावेश होता. समाज जागृती रथ यात्रे निमित्त बुधवारी पालिवाल समाज बांधवांनी सर्व व्यवसाय बंद ठेवण्यात येणार असल्याचे निर्णय बैठकीत घेण्यात आला. बैठकीत समाजातील महिला, युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.