पालिकेकडून भुयारी मार्गासाठी 5 कोटी 84 लाखांचा धनादेश

0

मार्चपर्यंत भुयारी मार्ग होईल खुला

हडपसर : ससाणेनगर, सय्यद नगर येथील रेल्वे क्रॉसिंगवर होणारी सततची वाहतूककोंडी त्रासदायक बनली आहे. या पार्श्‍वभूमीर भुयारी मार्गासाठी आमदार योगेश टिळेकर यांच्या पुढाकारातून पुणे महापालिकेच्या वतीने पाच कोटी 84 लाखांचा निधीचा धनादेश रेल्वे अधिकार्‍यांकडे सुपूर्द केला. त्यामुळे येथील वर्षानुवर्षे रखडलेला प्रश्‍न मार्गी लागणार आहे. आगामी चार ते सहा महिन्यांत भुयारी मार्ग तयार होईल, अशी अपेक्षा आहे. दरम्यान, पर्यायी भुयारी मार्ग करण्याचा मानस आमदार टिळेकर यांनी बोलून दाखविला होता. नगरसेवकांनी सह्यांच्या पत्राचा फ्लेक्स लावला होता. भुयारी मार्गाचा प्रश्‍न आम्ही सोडविला आमदार श्रेय घेत असल्याचा आरोप केला होता.

दोन दिवसांत प्रारंभ

येत्या आठ ते दहा दिवसांत प्रत्यक्षात भुयारी मार्गाचे काम सुरू होऊन मार्चपर्यंत हा भुयारी मार्ग नागरिकांसाठी खुला करण्यात येईल त्यामुळे येथील वीस वर्षांपासूनचा वाहतूककोंडीचा प्रलंबित प्रश्‍न सुटण्यास मदत होणार आहे. पाखरे म्हणाले, महापालिकेकडून या भुयारी मार्गासाठी निधीचा धनादेश प्राप्त झाला आहे लवकरच या भुयारी मार्गाचे काम सुरू करण्यात येईल.

चार वर्षांपासून पाठपुरावा

येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उड्डाणपूल करायचा की, भुयारी मार्ग हा वादातीत प्रश्‍न बनला होता. त्यावर उपाय म्हणून दिलेल्या आश्‍वासनानुसार सोमवारी महापालिकेच्या वतीने पाच कोटी 84 लाख रुपयांचा निधी रेल्वेचे वरिष्ठ अभियंता सुरेश पाखरे यांच्याकडे टिळेकरांनी सुपूर्द केला. यावेळी नगरसेवक संजय घुले, पालिकेचे उपअभियंता दाभाडे, कनिष्ठ अभियंता थोपटे, जीवन जाधव, हेमंत ढमढेरे, योगेश ढोरे, शांताराम जाधव उपस्थित होते. भुयारी मार्ग मंजूर पालिकेने केला होता. परंतु भूसंपादनात अडचणी आल्याने काम रखडले. येथील वाहतुकीचा प्रश्‍न गंभीर बनला होता, म्हणून गेली 4 वर्ष राज्य शासन, महापालिका व रेल्वे खात्याकडून पाठपुरावा करून पर्यायी दोन भुयारी मार्ग मंजूर करून घेतले. यासाठी सात ते आठ कोटी खर्च अपेक्षित असून पहिल्या टप्प्यात पाच कोटी 84 लाख रुपयांचा धनादेश रेल्वे अधिकार्‍यांकडे सुपूर्त केला आहे.

Copy