पालिका वर्धापनदिनानिमित्त अभिरूप सभेचे केले आयोजन

0

कर्मचार्‍यांना हवी आहे हेलीकॉप्टर सेवा तसेच शाकाहारी-मांसाहारी कॅन्टीन सुविधा!

अजब मागण्यांना नगरसेवकांनी दिला पाठिंबा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर हे दिवसेंदिवस जास्त स्मार्ट होऊ लागले आहे. त्यामुळे येथे नागरिकांची संख्या वाढते आहे. येथे काम-धंद्यासाठी येणार्‍यांमध्ये वाढ होते आहे. याचा परिणाम म्हणजे दिवसेंदिवस येथील वाहतुकीमध्ये आमुलाग्र बदल होऊन वाहतूक कोंडी वाढते आहे. त्यामुळे रोजच महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले असतात. परिणामी महापालिकेतील कामकाजास विलंब होतो. हा विलंब टाळायचा असेल तर महापालिका अधिकार्‍यांना व कर्मचार्‍यांना हेलिकॉप्टर सेवा उपलब्ध करून द्यावी. तसेच दिवसभर कामाशी दोन हात करण्यासाठी प्रत्येक मजल्यावर शाकाहारी-मांसाहारी कॅन्टीन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी महापालिकेच्या कर्मचार्‍यांनी केली. याला सर्व नगरसेवकांनी पाठिंबा दिला. मात्र, एकही उपसूचना स्वीकारायची नसल्याचे सांगत, या सर्व उपसूचना फेटाळून लावल्या.

भूमिकांमध्ये केला बदल
महापालिकेच्या 36 व्या वर्धापन दिनानिमित्त सभागृहात अभिरुप सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये अधिकार्‍यांनी सत्तारूढ पदाधिकार्‍यांची भूमिका तर पदाधिकार्‍यांनी अधिकार्‍यांची भूमिका वठवली. या सभेला महापौर श्रावण हर्डीकर, उपमहापौर प्रवीण आष्टीकर, सभागृह नेता प्रवीण तुपे, विरोधी पक्षनेता दिलीप गावडे उपस्थित होते. तर आयुक्त म्हणून महापौर राहुल जाधव यांनी प्रशासन प्रमुखाची भुमिका बजावली. याशिवाय सचिन चिंचवडे आणि ममता गायकवाड यांनी अतिरिक्त आयुक्त, तर नगरसचिव म्हणून एकनाथ पवार यांनी कामकाज पाहिले. या सभेला महापौर श्रावण हर्डीकर, उपमहापौर प्रवीण आष्टीकर, सभागृह नेता प्रवीण तुपे, विरोधी पक्षनेता दिलीप गावडे उपस्थित होते. तर आयुक्त म्हणून महापौर राहुल जाधव यांनी प्रशासन प्रमुखाची भुमिका बजावली. याशिवाय सचिन चिंचवडे आणि ममता गायकवाड यांनी अतिरिक्त आयुक्त, तर नगरसचिव म्हणून एकनाथ पवार यांनी कामकाज पाहिले.

महापौरांना पडला भूमिकेचा विसर
गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास या सभेला सुरुवात झाली. या सभेत महापौर राहुल जाधव यांनी आयुक्तांची भुमिका वठविण्यासाठी प्रशासकीय वेशभूषा व दाढी देखील राखली होती. मात्र वारंवार आयुक्त असल्याचा विसर पडून, महापौर असल्याच्या भुमिकेत जात असल्याने त्यांच्या वक्तव्याने सभागृहात अनेकदा हास्याचे फवारे उडाले. त्यांना महापौर असलेल्या हर्डीकर यांनी आयुक्त असल्याची अनकेदा जाणीव करुन दिली. त्यामुळे उपस्थितांची चांगलीच करमणूक झाली. महापालिकेचे झिरो बजेट’ असल्याची सभागृहाला माहिती देणार्‍या मुख्य लेखा परीक्षक आशा शेंडगे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नगरसेवकांनी केली. तर मग आता निधी उपलब्ध करुन देण्यासाठी महापौर हर्डीकर यांनी सुचविलेल्या उपाययोजनांमुळे सभागृह हास्यात बुडाले. सभागृहाला चुकीची माहिती देणारे ज्ञानदेव ओंबासे यांचे सभागृहातून पहिल्यांदा तीन मिनिटे नंतर दुसर्‍या चुकीसाठी तीस वर्षे निलंबनाची कारवाई करण्यात आली. याचे स्पष्टीकरण प्रशासनाला देता आले नाही. अभिरूप सभेच्या विषय पत्रिकेवर एकूण पाच विषय ठेवण्यात आले होते. त्यापैकी दोन विषय मंजूर करण्यात आले. तर भटक्या कुत्र्यांवरुन सभागृहातील गदारोळ टाळण्यासाठी अभिरुप सभा एक वर्षे कालावधीकरिता तहकूब करण्यात आली

Copy