पालिका रुग्णालयास दिले कुलर भेट

0

भुसावळ। वाढत्या तापमानामुळे नगरपालिका रुग्णालयात उष्माघात कक्ष असावा या हेतूने उष्माघात कक्षासाठी भुसावळ सामाजिक विचारमंचातर्फे सोमवार 2 रोजी कुलर भेट देण्यात आले. मंचच्या सदस्यांनी नगरपालिका रुग्णालयात लोगवर्गणीतून हा उपक्रम राबविला. विविध सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन भुसावळ सामाजिक विचारमंचच्या माध्यमातून शहरातील उद्याने आणि सामाजिक उपक्रमासाठी सामान्य जनतेकडून 1 रुपये वर्गणी गोळा करण्यात आली होती.

सध्या शहरात काही दिवसांपासून 40 अंशांच्यावर तापमानाची नोंद होत आहे. त्यामुळे मंचाच्या सदस्यांनी पुढाकार घेत हा उपक्रम राबविला. उष्माघात कक्षासाठी कुलर मिळाल्याने रुग्णालय कर्मचाछयांकडून या उपक्रमाचे स्वागत होत आहे. यावेळी नगरपालिका वैद्यकीय अधिकारी डॉ.किर्ती फलटणकर, सामाजिक विचारमंचाचे सदस्य नरविर सिंग रावळ, प्रा.जयेंद्र लेकुरवाळे, विनोद पाठक, नंदकिशोर पंड्या, गुरचळ, विवेक नरवाडे, रंजित राजपूत व संदिप पाटील उपस्थित होते.