पालिका मुख्य औषध निर्माण अधिकार्‍यांचे अल्पशा आजाराने निधन

यावल : तालुक्यातील सातोद येथील रहिवासी व यावल ग्रामीण रुग्णालयात मुख्य औषध निर्माण अधिकारी या पदावर कार्यरत असलेले सूर्यकांत धरमसिंग पाटील (56) यांचे जळगाव येथे एका खाजगी रुग्णालयात मागील 15 दिवसापासुन उपचार घेत असतांना मंगळवार, 27 एप्रिल रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, एक मुलगी असा परीवार आहे. अतिशय हसरे व्यक्तीमत्व सर्वांच्या कामात धावुन जाणारे एक बोलके व्यक्ती म्हणुन ते सर्वाना परीचीत होते. त्यांच्या निधनाने सातोद-कोळवद गावात शोककळा पसरली. इतरांच्या आरोग्याची काळजी घेणारे एक चांगला अधिकारी आपल्या आरोग्य कर्मचार्‍यांच्या कुटुंबातुन निघुन गेल्याचे दु :ख झाले असल्याची शोकसंवेदना वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला व त्यांच्यासह सर्व कर्मचार्‍यांनी व्यक्त केली.

Copy