पालिका कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबीर

0

चोपडा : चोपडा नगपरिषद रुग्‍णालयात न.प. सफाई कर्मचा-यांकरीता आरोग्‍य तपासणी शिबीराचे आयोजन करण्‍यात आले. सदर शिबीरात 103 सफाई कर्मचा-यांचे आरोग्‍य तपासणी करण्‍यात आली. वैद्यकीय अधिकारी डॉ.दिलिप साळुंखे तसेच नगरसेवक डॉ. रवींद्र पाटील यांनी कर्मया-यांची तपासणी केली. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्‍वलनाने झाली. सदर कार्यक्रमास नगराध्‍यक्षा मनिषा जीवन चौधरी, आरोग्‍य समिती सभापती मीनाताई प्रकाश शिरसाठ, प्रभारी मुख्‍याधिकारी व तहसीलदार दिपक गिरासे, नगरसेवक, सुरेखा मोतीराम माळी, सरला नरेंद्र शिरसाठ, शोभाबाई सदाशिव देशमुख, तसेच स्‍वच्‍छता निरिक्षक व्हि.के.पाटील, राजेंद्र बाविस्‍कर, महेद्र बडगुजर, रविंद्र जाधव, अनिल चौधरी व नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते.

Copy