पालघर हत्याकांड प्रकरणी पुन्हा २४ जणांना अटक

0

मुंबई: सात महिन्यापूर्वी एप्रिल महिन्यात पालघर जिल्ह्यातील एका गावात साधूंची निर्घुण हत्या करण्यात आली होती. जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आले होते. याप्रकरणी सीआयडी चौकशी सुरु असून या प्रकरणी पुन्हा २४ जणांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत १७८ जणांना या प्रकरणात अटक करण्यात आले आहे. या प्रकरणावरून राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारवर बरीच टीका झाली. हिंदू साधूंची हत्या करण्यात आल्याने याला धार्मिक वळण देखील लागले आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.