पालकांनो सावध व्हा; मुलांची काळजी घ्या!

0

मुंबई – कोरोनाचे रुग्ण वाढत असताना पालकांची चिंता वाढवणारी बाब समोर आली आहे. लहान मुलांमध्येही या विषाणूचा संसर्ग वाढीला लागल्याचे महाराष्ट्र सरकारने गुरुवारी जारी केलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

एक ते दहा वर्षे वयोगटातील २१ मुलांना कोरोनाची लागण झाली असून, ११ ते २० वर्षे वयोगटामध्ये हे प्रमाण ५६ इतके नोंदवण्यात आले आहे.

कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण हे ज्येष्ठ नागरिकांनंतर तरुणांमध्येही मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. सोशल डिस्टनसिंग, सरकारकडून वेळोवेळी केल्या जात असलेल्या सूचनांचे काटेकोर पालन हेच कोरोनाला मात देण्याचे पर्याय सध्या उपलब्ध आहेत.

Copy