पालकमंत्री पाटील यांची घेतली नागरिकांनी सदिच्छा भेट

0

जळगाव : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली डिपीटीसीच्या बैठकीचे आयोजन गुरूवारी करण्यात आली होती. परंतु, पदवीधर मतदार संघाची निवडणूक जाहिर झाल्याने ही बैठक रद्द झाली. पाटील पालकमंत्र्यांना भेटण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. यात सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, सामान्य नागरिक आदींनी भेटून आपल्या समस्या मांडल्या तसेच पालकमंत्रीपदी निवड झाल्याने त्यांचे अभिनंदन केले.आमदार सुरेश भोळे, चंदुलाल पटेल, किशोर काळकर, राजेंद्र फडके, जि.प.अध्यक्षा प्रयाग कोळी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष उदय पाटील आदी उपस्थित होते.

भाजपा नगरसेवकांनी दिले निवेदन
शहराचा विकास निधी अभावी रखडला असल्याने महानगर पालिकेला विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा यासाठी पालकमंत्र्याना भाजपा नगरसेवकांनी गटनेते सुनील माळी यांच्या नेतृत्वात भेट घेवून निवेदन दिले. याप्रसंगी विरोधी पक्षनेते वामन खडके, ज्योती चव्हाण, उज्वला बेंडाळे, सुचिता हाडा, पृथ्वीराज सोनवणे, नवनाथ दारकुंडे आदी उपस्थित होते. निवेदनाद्वारे शहाराच्या विविध समस्या मांडण्यात आल्यात. यात हुडको व जिल्हा बँकेचे 500 कोटी कर्ज थकीत असल्याने दरमाह जवळपास 4 कोटी रूपये व्याजापोटी जमा होत आहेत. यामुळे पालकमंत्र्यांनी मध्यस्थी करून हुडको व जिल्हा बँकेचे कर्ज एकरकमी भरण्याचा प्रयत्न करण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे.

केमिस्ट महासंघाद्वारे अभिनंदन
राष्ट्रीय महामार्गास लागून असलेल्या समांतर रस्त्याचा प्रश्‍न बिकट बनला असून तो ताबडतोब करण्याची मागणी करत शहरातून जाणार्‍या चौपदरी रस्त्यांचे काम सहा वर्षांपासून प्रलंबित असून ते त्वरीत करावे यासह इतर मागण्या या निवेदनात करण्यात आलेल्या आहेत. दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या केमिस्ट महासंघाचे महाराष्ट्र अध्यक्ष किशोर भंडारी, जळगाव शहरमहानगराध्यक्ष निशिकांत मंडोरा, साकीर चित्तवाल, प्रभाकर कोल्हे, कनक, दिपक हेडा, नितीन इंगळे, दिनेश येवले, संजय नारखेडे दर्शन तेजवानी, सुमित चौधरी आदींनी पालकमंत्र्यांची भेट घेवून त्यांचे अभिनंदन केले.