Private Advt

पारोळ्यात निवृत्त कर्मचार्‍याचे वेतन चोरण्याच्या प्रयत्न फसला : तरुणी जाळ्यात

पारोळा : शहरातील एका निवृत्त कर्मचार्‍याचे वेतन चोरी करण्याच्या प्रयत्नात मध्य प्रदेशमधील दोन तरुणींना अटक करण्यात आली. शनिवार, 16 रोजी दुपारी 1 वाजता ही कारवाई करण्यात आली.

वेतन चोरताना तरुणींना पकडले
शहरातील शनी मंदिर परीसरातील धर्मराज लोटन पाटील हे 16 रोजी दुपारी एक वाजता निवृत्ती वेतन काढण्यासाठी सेंट्रल बँकेत गेले होते. त्यांनी आपले वेतन 21 हजार काढून ते एका कापडी पिशवीत ठेवले. त्यानंतर ते बँकेबाहेर आल्यावर त्यांना दोन महिलांनी काका, काका … तुमची रक्कम सांभाळा, असे सांगितले. या वेळी धर्मराज पाटील घाबरून गेले. याचवेळी या महिलांनी त्यांच्या पिशवीला ब्लेडने दोन ठिकाणी फाडले. परंतु, तरी देखील पिशवीतील रक्कम न मिळाल्याने त्यांनी बनवाबनवी करत पैसे लुटण्याचा डाव केला, अन् तोच त्यांचा अंगलट आला. या वेळी याच परीसरात काही महिलांनी संशयित महिला अंजली सिसोदिया (वय 20) व रचना शिसोदिया (वय 30) यांना संशयास्पद स्थितीत पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याबाबत पारोळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. तपास संदीप सातपुते करत आहेत.