पारोळ्यात दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना अटक ; तिघे पसार

0

पारोळा- रात्र गस्तीवर असलेल्या पोलिस पथकांच्या दक्षतेमुळे दरोडा टाकण्याच्या तयारीत असणार्‍या पाच पैकी दोन आरोपींना अटक करण्यात आली. इतर तीन अरोपी पसार झाले असले तरी त्यांचा ठावठिकाणा पोलिसांना मिळाला आहे. हवालदार इकबाल शेख व राहुल कोळी हे कजगाव चौफुलीवर गुरुवारी पहाटे तीन वाजता रात्रीच्या गस्तीवर होते. त्यांना एक पॅजो रीक्षा व एका दुचाकीवर (एम.एच.19. ए.डब्लू.6756) दोन तरुणांनी आपले तोंड रुमालाने झाकले दिसले. पोलिसांना पाहून त्यांनी पलायन केले. यानंतर पोलिस निरीक्षक विलास सोनवणे व एपीआय अजितसिंग देवरे, संजय सोनवणे, किरण सोनवणे यांना बोलावून घेत पथकाने त्यांचा पाठलाग केला. त्यात दुचाकीस्वारांना पकडण्यात पोलिसांना यश आले. परंतु रीक्षातील तिघे भरधाव वेगाने चोरवड रस्त्याला पळून जाण्यात यशस्वी झाले. दुचाकीवरील दोघांची चौकशी केली. त्यांनी शेख आरिफ शेख युनुस व सय्यद नदीम सय्यद मोहंमद (रा.गोराडखेडा, ता.पाचोरा) येथील संशयीत सोबत असल्याचे सांगितले.