Private Advt

पारोळा स्टेट बँकेत आलेल्या वयोवृद्धेकडील 41 हजारांची रोकड लांबवली

भुसावळ/पारोळा : पारोळा शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियात आलेल्या 65 वर्षीय महिलेकडील 41 हजार रूपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लांबवली. या प्रकरणी पारोळा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात आरोपीचा पोलिसांकडून शोध
मालुबाई कैलास पाटील (65, पळासखेडे, ता.पारोळा) या कामाच्या निमित्ताने बुधवार, 23 मार्च रोजी पारोळा येथील स्टेट बँक ऑफ इंडीयात आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या जवळील 41 हजारांची रोकड अज्ञात व्यक्तीने लांबवली. वृध्द महिलेने पारोळा पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार बापुराव पाटील करीत आहे.